*अभिनव गीत*

अभिनव शिक्षण संस्था हे, मंदिर महान ज्ञानाचे
विद्या ग्रंथातील गौरवशाली,पान हे सोन्याचे||धृ।।
बुलंद इथली भव्य इमारत पाठी सह्यगिरी
अगस्तींच्या ज्ञानतेजाने न्हाली दरी दरी
गुरुशिष्य हे प्रतिभावैभव, इथल्या लेण्याचे ।।१।।
शिक्षणमहर्षी यांनी केल्या पवित्र या भिंती
यश, किर्ती ही मिळवून केली चौफेर भ्रमंती
तिर्थ लाभले प्रेरक दैवी, प्रवरा पाण्याचे ।।२।।
ज्ञानदीप होऊनी उजळले इथले विद्यार्थी
कृतार्थ झाली त्या कार्याने पावन ही धरती
मनी मनगटी बळ हे रुजले, मराठी बाण्याचे ।।३।।
करू प्रार्थना तुला ईश्वरा अशीच दे माया
माथ्यावरती सदा राहू दे तुझी कृपाछाया
तिमिरातुनी तेज होऊ दे, स्वर या गाण्याचे ।।४।।

Vasundhara At A Glance