अभिनव च्या ध्रुवी खताळ हिची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये नोंद


अभिनव शिक्षण संस्थेच्या वसुंधरा अकॅडेमीची विद्यार्थीनी कु. ध्रुवी अरुण खताळ    हिची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंद झाली.  नृत्य स्पर्धांमध्ये २०१५ ते २०१८ या तीन वर्षांत सर्वाधिक म्हणजेच १३० पारितोषिके व १८ पदके अगदी कमी वयात मिळविल्याबद्दल धृवीची नोंद    इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये  झाली. एवढे यश  मिळविणारी धृवी अवघे ८ वर्षे वयाची आहे. अभिनव शिक्षण संस्थेच्या वसुंधरा अकॅडेमी मध्ये ती इयत्ता दुसरीत शिकत आहे .